Click here to submit your review.


Submit your review
* Required Field

पराशर-एक अनुभव -------काल गेलो होतो मनोज हाडवळे यांच्या परा

Nov 10, 2014 by Rajesh Mandlik
City: Pune 

पराशर-एक अनुभव -------

काल गेलो होतो मनोज हाडवळे यांच्या पराशर रिसोर्ट ला. कंपनीची ट्रीप घेऊन. २१ जण होतो. गेल्या गेल्या स्वागत झालं पार गंध आणि फुलांचे हार वैगेरे घालून. फ्रेश होऊन गोंधळाचा घाट घातला होता. भगवान काटे म्हणून कलाकार होते. असली संबळ घुमवली त्यांनी कि आमचे पोट्टे सगळे नाचायलाच लागले. लोककला काय झिंग आणू शकते याचा जिवंत अनुभव घेतला. खूप आरडाओरडा हि केला. मनोज, त्याचे सहकारी आणि आजूबाजूची झाडी यांनी आम्हाला सहन केलं. रात्री रसरशीत मासवाडीचं जेवण केलं. जेवणाचा दर्जा "अत्युत्कृष्ट" या सदरात मोडणारा. रात्री कॅम्प फायर आणि त्याभोवती आमची सगळी पोरं कोंडाळ करून बसली. एकेकाला कंठ फुटायला लागला. नागेश, इरफान, मिलिंद, अनिल, गणेश आणि मी सुद्धा, आम्ही खूप गाणी म्हंटली.

सकाळी उठून टेकडीवर चढायला गेलो. बरोबर विकास होता रिसोर्ट चा. त्याने लिंबू सरबत घेतलं होतं कॅन भरून. वरती महादेवाचं मंदिर होतं. दर्शन घेतलं. समोर दर्गा होता. तिथे कपाळावर गंध लावलेला माणूस, अगदी बजरंग दलाचा सदस्य वाटत होता, दुकान लावून बसला होता. आम्हाला म्हणाला "दर्ग्याच दर्शन घ्या." आम्ही गेलो. स्वच्छ होता. एक बाई डोक्यावरती ओढणी घेऊन प्रार्थना करत होती. कपाळावर टिकली होती. तिचा नवरा दर्ग्यातल्या बाबाशी स्वच्छ मराठीत बोलत होता. मी पण दर्ग्याला नमस्कार केला. परत आलो. परत येताना आमच्या कार सिंगल रस्त्यावरून येत होत्या. एक सायकलवाला आणि नंतर मोटर सायकलवाला समोरून आले. दोघंही बाजूला उभे राहिले. आमच्या ५ कार जाईपर्यंत.

मिसळीचा नाश्ता झाला. मग टीम बिल्डींग च्या activities. आम्ही ट्रेनर नेला होता. मनोज चा हि माणूस होता. एकमेकांची चेष्टा करत, गप्पा मारत तीन तास कसे गेले कळलेच नाही. मी पोरांना अन मुलं मला मित्रच समजायला लागले होते. परत भूक लागली. कदाचित खूप oxygen शरीरात गेल्यावर भूक लागत असावी. मी निष्कर्ष काढला.

आणि मग पुन्हा एकदा झकास जेवण जेवलो. दुपारी सव्वा ते दोन मनोजशी अन त्याची बायको नम्रता यांच्याशी गप्पा मारल्या. कृषी पर्यटन, अखिल भारतात असलेली ४५०० पेक्षा जास्त कृषी सेंटर आणि त्याचा पर्यटनासाठी वापर, शेती कडे इंडस्ट्री म्हणून बघण्याची गरज, शेतकर्याच्या मुलाला दुसरा शेतकरीच मुलगी देत नाही, ते बदलण्याची सामाजिक गरज अशा विविध विषयावर मनोज कुठलाही अभिनिवेश न बाळगता बोलत होता. मागेच त्याचं पुस्तकाचं rack बघितलं. व्यवस्थित मांडली नव्हती, पण बर्याच विषयांवरची बरीच पुस्तकं होती. त्याने मलाही पुस्तक भेट देण्याच्या लायक समजलं.

परत आमच्या काही activitiesझाल्या. साडेतीन वाजता निघायची वेळ झाली. खूपच साधं ठिकाण, अत्यंत साधी लोकं.मनोज, त्याची बायको नम्रता आणि त्यांचे सहकारी. कुठेही भपका नाही. मनोजला मी मिठी मारून त्याचा निरोप घेतला. तेव्हा मला एका अकृत्रिम स्नेह जाणवला, इतका कि लेख चालू करताना अहो जाहो करणारा मी आता अरे तुरे पर्यंत आलो.

निघालो पण का कुणास ठाऊक, मला विचित्र वाटत होतं. काहीतरी या रिसोर्ट मध्ये कमी आहे. काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं.

वाटेत चहाला थांबलो.कार चालू केली कारच्या सायलेन्सर ला नाक लावलं. कार्बन डाय oxideछातीत भरून घेतला. तिथून निघालो. कासारवाडीला गळ्यात सोन्याचा गोफ घातलेला, पांढरा शर्ट वाला गॉगल धारी, मोटरसायकल दामटत माझ्या कारसमोर आडवा आला. त्याने माझ्या आईबापाचा उद्धार केला. मी पण त्याच्या अन माझ्या देहयष्टीचा अंदाज घेऊन यथाशक्ती शिव्या घातल्या. दापोडीच्या पुढे एक मुस्लिम तरुण सिग्नलला माझ्याकडे द्वेषाने बघतो आहे असं मला त्याच्याकडे द्वेषाने बघताना जाणवलं. आम्ही कारमधील तिघं जण बालगंधर्व समोरच्या शेट्टी च्या हॉटेल मध्ये रात्रीचं जेवण केलं. भात खात होतो तेव्हापासून हॉटेलच्या manager ने पुढचं गिऱ्हाईक आमच्या डोक्यावर आणून ठेवले. ते आम्ही जेवण कधी संपवतो हे आशाळभूतपणे पाहत राहिले. जेवण झाल्यावर तेलयुक्त पंजाबी जेवणाचा ढेकर दिला. आज सकाळी कंपनीत आलो. कस्टमर ला खोटी आश्वासनं दिली. कंपनीतल्या पोरांवर डाफरलो. फेसबुकवर शहाणपणा करत एक पोस्ट टाकली. दोन चार दीड शहाणपणाच्या comments टाकल्या. आपल्याच प्रतिमेला घट्ट चिकटून बसणारा शहरी माणूस झालो. आताकुठे मला जे कालपासून विचित्र वाटत होतं, ते कमी झालं.

पण मला अजूनही मनोज आणि नम्रताच्या पराशर रिसोर्ट मध्ये काय कमी आहे हे कळलेलं नाही आहे.

बघा, तुम्हीच एकदा तिथे भेट द्या आणि शोधा याचं उत्तर. आणि सापडलंच तर मलाही सांगा


exactly like how i had imagined. Beautiful, well maintained and scenic. The hospitality has been remarkable, right from the owner Manoj to the lady se

Nov 10, 2014 by Pallavi Chakrabarty
City: Pune 

exactly like how i had imagined. Beautiful, well maintained and scenic. The hospitality has been remarkable, right from the owner Manoj to the lady serving the food. Definitely a place i will coming back.
Thank you Manoj & Namrata
Bidisha & Pallavi


Very nice place to stay Manojji..keep it up.Very nice to know that you are running this unique tourism with your terms & values which is very rare i

Nov 10, 2014 by Avinash Kharshikar
City: Pune 

Very nice place to stay Manojji..keep it up.
Very nice to know that you are running this unique tourism with your terms & values which is very rare in this field. Congratulations and best wishes for future.
Avinash Kharshikar


Dear Namrata & Manoj,Before i write anything about this place i would like to tell you that it was a pleasure meeting and talking to both of you and

Nov 09, 2014 by Vanindar
City: Mumbai 

Dear Namrata & Manoj,
Before i write anything about this place i would like to tell you that it was a pleasure meeting and talking to both of you and knowing your vision.Our best wishes with both of you and we hope all your dreams come true.
About the place, we had a great time..has been a second home. ..will recommend this place to friends and family. ..has been a great rustic food. Food was great and amazing hospitality.
All the best..
Stay in touch.
Vanindar, Madhuri, Nikhil, Rishi.


It is our pleasure to stay at your unique Agritourism for last 3 days. Your enthusiasm, determination, dedication and hard work, will help you to come

Nov 08, 2014 by S V Mathure
City: Mumbai 

It is our pleasure to stay at your unique Agritourism for last 3 days. Your enthusiasm, determination, dedication and hard work, will help you to come up with flying color years to come. Every successful person has a wife behind him.
We bless you prosperous future and good regards
S V Mathure


आजचा दिवस म्हणंजे मलाच मिळालेला अभिप्राय आहे असे वाटते.

Nov 08, 2014 by Jyoti Deshmukh
City: Latur 

आजचा दिवस म्हणंजे मलाच मिळालेला अभिप्राय आहे असे वाटते. माझ्या विद्यार्थ्याचे यश म्हणजे माझ्यासाठी यशाचे शिखर आहे. मनोज आणि नम्रता तुमच्या भावी आयुष्यासाठी खुप साऱ्या शुभेच्छा. पराशर कृषी पर्यटन केंद्र मला भारतीय संस्कृतीचे प्रतिक वाटते. सुंदर परिसर आणि आपलं माणुस हे येथील वैशिष्ट्य आहे. आपली वाटचाल अशीच उंचावत राहो.
शुभाशीर्वाद.
ज्योती मांडे देशमुख
लातुर


Indeed its a good experience, i love to be here again. Really enjoyed..its special as my parents, kids and my wife we all enjoyed together. घर

Nov 02, 2014 by Rajesh Gadekar
City: Pune 

Indeed its a good experience, i love to be here again.
Really enjoyed..its special as my parents, kids and my wife we all enjoyed together.
घरा बाहेरचे घर..जिथे पुन्हा पुन्हा यावं.
राजेश गाडेकर.


खुपच सुंदर अनुभव. खासकरून मुलांसाठी.आजकालच्या जीवनशैली

Oct 31, 2014 by समीर धारूरकर
City: Thane 

खुपच सुंदर अनुभव. खासकरून मुलांसाठी.
आजकालच्या जीवनशैलीमध्ये हा अनुभव मुलांसाठी आवश्यक आहे. आपली संस्कृती जपण्यासाठी गरजेचे आहे.
सगळ्यांकडून खुपच आपुलकीची वागणुक..घरच्या सारखं वातावरण असल्यामुळे खुपच आपलेपणा वाटला.
समीर, मानसी, सोहम.


श्री मनोज व सौ नम्रता,२ दिवस कुटुंबासमवेत तुमच्या सानिध

Oct 31, 2014 by सुधांशु नाईक
City: चिपळूण 

श्री मनोज व सौ नम्रता,
२ दिवस कुटुंबासमवेत तुमच्या सानिध्यात अत्यंत सुखाचे गेले.
मी सध्या कतारला अत्यंत व्यस्त व ताणतणावाच्या वातावरणात काम करतोय मात्र ते सर्व इथे येवूउन विसरलो. पुन्हा पुन्हा इथे यायला आवडेल. तुमच्या "पराशर- हचीको" ची माहिती मित्र मंडळींना जरूर देईन. भेटत राहूच.
सायोनारा.
सुधांशु नाईक.


नक्कीच.... ४ दिवस सहकुटुंब येऊन राहण्य्साठी उत्तम.श्री मनो

Oct 31, 2014 by अरविंद जोशी
City: Pune 

नक्कीच.... ४ दिवस सहकुटुंब येऊन राहण्य्साठी उत्तम.श्री मनोज यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे कृषी पर्यटन केंद्र...खुप आवडले.
जोशी स्वीट्स
पुणे


Parashar Agritourism +91 - 9970 515 438 Kalyan-Nagar Road, Rajuri, Tal:Junnar, Dist:Pune Pune MH, 412411 INDIA 4.7 5.0 95 95 Visited Parashar in March 2019 with family. Eco friendly place in true sense. Amazing hospitality. Manoj and his team are excellent hosts. You will enjoy farm tour (especially grap
Parashar Agritourism
Kalyan-Nagar Road, Rajuri, Tal:Junnar, Dist:Pune PuneMH412411 INDIA 
 • +91 - 9970 515 438
Packages | How to enjoy | Junnar Darshan