सग्यांच्या साथीने, सोयरी वरात; माझिया दारात, विसावते.
सकाळी लवकर जाग आली, उजाडायच्या आधीचं तांबुस वातावरण होतं. अंथरूनावर डोळे उघडले तेव्हा शांत होतं, उठून बाहेर येईस्तोवर हे गलका सुरु झाला. तसे १२-१३ प्रकारचे पक्षी दिसत असतात, पण त्यातल्या त्यात साळकाया माळकाया चिमण्यांचा राबता लय मोठा. लय म्हणजे एका वेळी ४०-५० चिमण्या आजूबाजूला उडताना, तावातावाने भांडताना दिसू लागतात. मी पराशरच्या परिसरातील औषधी वनस्पतींची पाने…