कृषी पर्यटन आणि ग्रामविकास
आपल्याकडं एकाच भौगोलिक तुकड्यावर दोन देश रहात आहेत, इंडिया आणि भारत. इंडियाला उर्वरित जगाविषयी आकर्षण आहे, भारताला इंडियाविषयी आकर्षण आहे आणि उर्वरित जगाला भारताविषयी ओढ आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. यासाठी आपल्याला काही आकडेवारी समजून घेतली पाहिजे. आपल्या देशातील एकूण लोकसंख्येच्या जवळपास ३०% लोकं शहरात राहतात आणि उरलेले ७०% लोकं हे…