Post your reviews here..
Jyoti Deshmukh
आजचा दिवस म्हणंजे मलाच मिळालेला अभिप्राय आहे असे वाटते. माझ्या विद्यार्थ्याचे यश म्हणजे माझ्यासाठी यशाचे शिखर आहे. मनोज आणि नम्रता तुमच्या भावी आयुष्यासाठी खुप साऱ्या शुभेच्छा. पराशर कृषी पर्यटन केंद्र मला भारतीय संस्कृतीचे प्रतिक वाटते. सुंदर परिसर आणि आपलं माणुस हे येथील वैशिष्ट्य आहे. आपली वाटचाल अशीच उंचावत राहो. शुभाशीर्वाद. ज्योती मांडे देशमुख लातुर
Rajesh Gadekar
Indeed its a good experience, i love to be here again. Really enjoyed..its special as my parents, kids and my wife we all enjoyed together. घरा बाहेरचे घर..जिथे पुन्हा पुन्हा यावं. राजेश गाडेकर.
समीर धारूरकर
खुपच सुंदर अनुभव. खासकरून मुलांसाठी. आजकालच्या जीवनशैलीमध्ये हा अनुभव मुलांसाठी आवश्यक आहे. आपली संस्कृती जपण्यासाठी गरजेचे आहे. सगळ्यांकडून खुपच आपुलकीची वागणुक..घरच्या सारखं वातावरण असल्यामुळे खुपच आपलेपणा वाटला. समीर, मानसी, सोहम.
सुधांशु नाईक
श्री मनोज व सौ नम्रता, २ दिवस कुटुंबासमवेत तुमच्या सानिध्यात अत्यंत सुखाचे गेले. मी सध्या कतारला अत्यंत व्यस्त व ताणतणावाच्या वातावरणात काम करतोय मात्र ते सर्व इथे येवूउन विसरलो. पुन्हा पुन्हा इथे यायला आवडेल. तुमच्या “पराशर- हचीको” ची माहिती मित्र मंडळींना जरूर देईन. भेटत राहूच. सायोनारा. सुधांशु नाईक.
अरविंद जोशी
नक्कीच…. ४ दिवस सहकुटुंब येऊन राहण्य्साठी उत्तम.श्री मनोज यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे कृषी पर्यटन केंद्र…खुप आवडले. जोशी स्वीट्स पुणे